जो मनुष्य सुदृढ आहे त्याने जसे जमेल तसे रक्तदान अवश्य करावेत.
कोरोनाच्या दुष्टचक्राने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप दिवसांनंतर टाटा मोटर्स, कार प्लान्ट, पुणे येथे आज २९ सप्टेंबर २०२१ रोजी रक्तदान करण्याचा योग आला. खूप समाधान वाटले.
आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.आत्ताच्या काळात क्रांतिकारी विचाराच्या व्यक्तीने मानसिक व वैचारिकरित्या मृत पावलेल्या स्वयंकेंद्रित लोकांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाविरूद्ध लढणे म्हणजे आपल्या क्रांतीकारी विचारांचा, स्वाभिमानी बाण्याचा व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीचा स्वतःच्याच हाताने खून केल्यासारखे आहे.
कारण सध्याच्या काळात लोकांना आपल्या महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या महान कार्याची प्रकर्षाने आठवण येते. अगदी अभिमानाने ते त्यांच्या कार्याचे गोडवे गात असतात. हे महापुरूष, क्रांतिकारक पुन्हा जन्माला यावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु या महान व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान पाहता त्यांचा जन्म आपल्या घरात न होता इतरांच्या घरात व्हावा व पुन्हा त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन इतरांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय घरबसल्या मिळवून द्यावेत अशी काहीशी सर्वांची मानसिकता झाली आहे.
त्यामुळेच मी हा प्रश्न मांडत आहे.....लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
दुडूदुडू चाले बालपण अन्
तरूणपणाची चाल निराळी
वार्धक्यामध्ये थकते शरीर पण
अनुभवाने येते तेज कपाळी
✒ K. Satish
' जीवन '... प्रत्येकाला जीवनात अंधारमय क्षणांना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अशा क्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करावे लागते. या अंधारमय क्षणांवर मात करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याकरिता सतत प्रयत्नांचे प्रकाशमय दिवे तेवत ठेवण्याची आवश्यकता असते.
परंतु , बहुतांशी लोक हे दुसर्याच्या जीवनातील अंधार पाहून खुश होत असतात. किंबहुना हा अंधार अजून गडद कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. पण दुसर्याच्या जीवनातील अंधाराचा आनंद घेण्याच्या आणि तो अजून काळाकुट्ट करण्याच्या नादात असे लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी लागणारे पुरेसे प्रयत्न करण्यास विसरूनच जातात. व दुसर्याचे आयुष्य अंधारमय बनवण्याच्या नादात स्वतःच कधी अंधाराच्या गर्द छायेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला ढकलून देण्यास कारणीभूत ठरतात हे त्यांना कळतच नाही.
अंधार दुसर्याच्या जीवनातला
पाहूनी होतो आनंद का ?,
कपट मनामध्ये ठेवून असा रे
आयुष्यामध्ये जगतो का ?
वृत्ती नाही चांगली ही तर
घातक ठरेल तुलाच रे,
मन तू निर्मळ कर स्वतःचे
दिशा नवी जीवनाला दे
✒ K. Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...