वाढदिवसाचा सोहळा साजरा करताना केक कापण्याची पद्धत जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचलित आहे. त्या केकच्या मधुर स्वादाची चव सर्व मित्रपरिवारासोबत चाखून या आनंदी सोहळ्याचा गोडवा वाढत असतो. त्यामुळे केकचे डेकोरेशन व त्याची गुणवत्ता व चव हे जर उत्कृष्ट असेल तर त्याची रंगत काही औरच असते. व त्याचा आस्वाद घेणाऱ्याच्या तोंडूनही केकविषयी व तो बनविणाऱ्याच्या कामाविषयी कौतुकाचे सूर निघणे अभिप्रेतच आहे.
सिद्धीच्या वाढदिवसानिमित्त बनविण्यात आलेल्या केकविषयीदेखील सर्वांनी मनापासून अशाच प्रतिक्रिया दिल्या. यानिमित्ताने वृशालीज केक बास्केट, बारामती यांचे मी मनापासून आभार मानतो.
खरं म्हणजे कोणतीही पाककृती करताना बनवणाऱ्याच्या मनातील सद्भावना, आपण बनविलेल्या पदार्थाच्या चवीने तो पदार्थ खाणाऱ्याला सर्वोच्च आत्मीय समाधान मिळवून देण्याची उत्कट इच्छा व आपल्या कार्याप्रती समर्पणाची भावना ही त्या पाककृतीला सर्वोत्कृष्ट बनवित असते. आणि हे सर्व वृशालीज केक बास्केट, बारामतीच्या सर्वेसर्वा वृशाली मॅडम यांनी सिद्धीच्या वाढदिवसानिमित्त बनवलेल्या केकच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले.
विशेष म्हणजे समक्ष एकदाही भेट न होता फक्त फोनवर संवाद साधून ऑर्डर दिली असता आणि मी सुचवल्याप्रमाणे जवळपास त्याच डिझाईनचा सुंदर केक तयार करून त्यांनी त्यांच्या या कलेच्या माध्यमातून आमची मने जिंकली. केक कसा बनेल, डिझाईन जमेल की नाही, शिवाय फक्त फोनवर ऑर्डर दिली असल्याने केक वेळेवर तयार करून मिळेल की नाही याविषयी सुरूवातीला साशंकता होती. परंतु २२ तारखेला बारामतीला त्यांचा पत्ता शोधत पोहोचल्यावर जेव्हा केक पाहिला त्यावेळेसच मनात कौतुकाचे स्वर उमटले. त्यातच मॅडमचा साधेपणा व नम्रतापूर्वक बोलण्याची पद्धत आवडली. परंतु त्याहूनही महत्वाचे हे की, केकची गुणवत्तादेखील अतिशय उत्तम होती अशी प्रतिक्रिया जेव्हा त्याचा आस्वाद घेणाऱ्या शुभचिंतकांनी दिली त्यावेळी वृशाली मॅडमचे पुन्हा आभार मानावेसे वाटले.
आमच्या सिद्धीच्या वाढदिवशी आपल्या उत्कृष्ट पाककृतीच्या माध्यमातून सुंदर व स्वादिष्ट केक बनवून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद...!!! 🙏🏻
✒ K.Satish