Monday, June 20, 2022

घुंगट की आड से

घुंगट की आड से यूँ

छुप छुप के ना हमे देखा करो,

दीदार तेरा करने के लिए

हम भी बडे बेचैन है ।

✒ K. Satish



Friday, June 17, 2022

अभिनंदन, शुभेच्छा, कौतुक

आयुष्यातील एक एक टप्पा 
पार पाडत आहात तुम्ही, 
जिद्दीने येणार्‍या प्रत्येक क्षणाला
सामोरे जात आहात तुम्ही

प्रगतीचे तुम्ही शिखर चढावे
हीच मनोमन इच्छा,
तुमच्या भावी आयुष्याला माझ्या
लक्ष लक्ष शुभेच्छा...!!!

दहावीच्या परीक्षेचा महत्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!!!

तसेच प्रयत्न करूनही परीक्षेत अपयश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने, नव्या जोमाने अभ्यास करून पुन्हा परीक्षेत मोठे यश संपादन करण्यासाठी बळ प्राप्त होवो, हीच मनापासून सदिच्छा...!!!

✒ K. Satish



चाँद भी शर्मिंदा है ।

चाँद की रोशनी से सारे तारे चमक उठे,

वह देख दिल की गहराई ने कहा, उफ क्या हँसी नजारा है ।

पर तेरे आने से फिजा में जो रौनक आई है,

उसे देखकर चाँद भी शर्मिंदा है ।

✒ K. Satish


 

Tuesday, May 3, 2022

आचरण महत्त्वाचे

      समाजात काही नाती ही अतिशय आदरणीय असतात. परंतु त्याला अपवाद असणाऱ्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणेही याच समाजात आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळेच तर जन्मदात्या पित्याकडूनच स्वतःच्या मुलीवरच अत्याचार करण्याच्या घटना असो, स्वतःच्या स्वार्थापोटी व व्यभिचारापोटी स्वतःच्याच मुलांची हत्या करणारी माता असो वा आर्थिक लोभ किंवा वासनेपोटी आपल्या शिष्यांचे शोषण करणारे गुरूजन असो ...अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसे या महान नात्यांच्या आडून आपल्या वाईट मनसुब्यांना पूर्णत्वास नेत असतात.

     समाजात नेहमी माता, पिता, गुरूतुल्य व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती यांना नात्याच्या आधारे अथवा समाजातील आदरणीय स्थानाच्या आधारे झुकते माप दिले जाते. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा अशी नात्यांच्या आड दडलेली काही अपप्रवृत्तींची मंडळी घेतात व आपल्या दुष्कृत्यांना अंमलात आणून अनेक निष्पापांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आणि त्यामुळेच अनेकदा नकळतपणे समाजाची भूमिकादेखील अशा चुकीच्या गोष्टी घडण्याला बळ देणारी ठरते.

     अतिशय खालच्या पातळीवर घसरून नात्यांना काळिमा फासणाऱ्या व्यक्तींना केवळ नात्यांचा मान राखण्याची पारंपारिक औपचारिकता पूर्ण करण्याहेतूने मान देण्याचा अट्टाहास करण्याची समाजातील मानसिकता ही मानवता व माणुसकीचा गळा दाबून हत्या करण्यासमान आहे.अशामुळेच अनेक अपप्रवृत्तींच्या व्यक्ती केवळ नात्याचा आधार घेऊन व समाजाची सहानुभूती मिळवून इतर निष्पापांच्या आयुष्याशी खेळण्यात यशस्वी होतात.

     म्हणूनच म्हणतो की,

प्रवृत्ती ही दुष्टच ज्याची
त्याला नाते कळेल कसे,
ढोंगी, कपटी या लोकांना
मानवतेचे भान नसे

वय अन् नाते दुय्यम ठरती
षडयंत्री मन ज्याच्या ठायी,
स्वार्थ, वासना, व्यभिचार हे
त्याच्या नसानसांमध्ये वाही

याच समाजामध्ये दिसतो 
बलात्कारी पिता,
आणि कुकर्मापायी मुलांचा
बळी घेणारी माता

माता, पिता, गुरू बनणे सोपे
संदेश सार्‍यांना कळवावा,
या नात्याचा सन्मान आपल्या
आचरणातून मिळवावा...

✒ K. Satish





Saturday, April 23, 2022

जागतिक पुस्तक दिन

वृक्षांपासूनी बनतो कागद

कागदापासूनी पुस्तक,

त्यातून मिळते ज्ञान असे की

तल्लख होते मस्तक


जागतिक पुस्तकदिनाच्या

सर्व आबालवृद्ध नागरिकांना

हार्दिक शुभेच्छा...!!!


झाडे लावा

झाडे जगवा...!!!

✒ K. Satish





Saturday, March 12, 2022

अडचणींच्या डोंगरावरती वसले शिखर यशाचे

     आयुष्यात पुढे पुढे जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पुढे जाऊन जर काही चांगले घडणार असेल तर अगोदर अनेक वाईट घटना आपल्या आयुष्यात घडत जातात.
     पूर्वी हे घडत असताना खूप त्रास व्हायचा. वाटायचे आपण तर काही चुकीची कृती करीत नाही, तरी आपल्यावर असे आघात का होत असावेत ?....त्यामुळे मन सतत नकारात्मक चक्रात गुरफटले जायचे.
     परंतु, जीवनातील सर्व चढउतारांनी, घडत गेलेल्या घटनाक्रमांनी आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर वाईट घटनांकडे पुढील आयुष्यात चालून येणाऱ्या सुखाची नांदी म्हणून पाहायला शिकवले. त्यामुळे वाईट घटना घडल्यास त्याचे दुःख हे लगेच विरून जाते व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक न राहून सकारात्मक होतो.
     ही मानसिकता लगेच तयार होणे अशक्य आहे. पण असंख्य आघात झेलल्यानंतर जेव्हा त्यातून चांगल्या घटना घडण्याची अनुभूती यायला लागते, तेव्हा आपसूक आपली विचारसरणी सकारात्मक बनू लागते.
     परंतु, अनेकांमध्ये ही प्रगल्भता येण्याआधीच त्यांच्याकडून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते, अथवा सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात विकसित होते.
     आणि याच मानसिकतेमुळे त्यांना या वाईट घटनाचक्राच्या दाट धुक्यांच्या थोडे पुढे सुखद यशाची सोनेरी किरणे पंख पसरून त्यांच्यासाठी उभी असल्याची आणि त्रासाची ही मालिका संपून सुखाचे क्षण उपभोगण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ते पोहोचले असल्याची जाणीवच होत नाही.
     त्यामुळे ज्यांना आपल्या आयुष्यात अजूनही अशा घटनाक्रमांना सामोरे जावे लागले नसेल त्यांनी ( मुख्यत्वेकरून तरूण पिढीने ) येणाऱ्या प्रत्येक वाईट प्रसंगाला, त्रासाला कंटाळून न जाता पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी नक्कीच चांगले घडणार आहे, एखादा चांगला बदल घडून एखादी सुवर्णसंधी आपली वाट पाहत असावी म्हणूनच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही आपली कठोर परीक्षा तर नाही ना ? हा विचार केल्यास घडणाऱ्या कोणत्याही वाईट घटनांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर जास्त काळ राहणार नाही. आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवणारी व्यक्ती सहसा अपयश पदरात पाडून घेत नाही. आणि काही कारणास्तव अपयश आलेच तरीही त्यातून यशाच्या नवीन मार्गाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. व अशा व्यक्तीसाठी यशाचे मार्ग हे आपसूकच खुले होतात.

✒ K. Satish



Monday, January 10, 2022

क्षणभंगुर आनंद

काही व्यक्तींना सतत दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.

परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.

आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.

✒ K. SATISH





कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...