आपल्या विरोधी शत्रूपासून सावध असूनही
आपल्याला दगाफटका होतोच....
कारण आपला घात करणारा
विश्वासघाताचा खंजीर
आपल्या विरोधकाकडे नसून
आपल्याच एखाद्या निकटवर्तीयाकडे असतो.
✒ K. Satish
आपल्या विरोधी शत्रूपासून सावध असूनही
आपल्याला दगाफटका होतोच....
कारण आपला घात करणारा
विश्वासघाताचा खंजीर
आपल्या विरोधकाकडे नसून
आपल्याच एखाद्या निकटवर्तीयाकडे असतो.
✒ K. Satish
कोरोना खोटा आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. कारण त्याचा त्रास मी स्वतः अनुभवला आहे. परंतु , त्याच्या नावाखाली अनेकजण आपली पोळी भाजण्याचा जो काही घाणेरडा प्रकार करीत आहेत त्याचा निषेध करावा तितका कमी.
पण मरणाऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणार्यांकडून चांगल्याची अपेक्षा कशी करता येईल ?
मूठभर राजकारण्यांच्या हाती देश चालवायला दिलेल्या सामान्य नागरिकांना मात्र या राजकारण्यांच्या राजकीय कुरघोड्यांचे शिकार होऊन या देशाचे खरे वारसदार असतानाही गुलामगिरीचे आयुष्य जगावे लागते.
याहून मोठी धक्कादायक व दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असेल ? ? ?
✒ K. Satish
पक्वान्नांची रास कुणापुढे
कुणास एकही घास मिळेना,
विरोधाभास हा या जगतातील
संपणार कधी मज हे कळेना
✒ K. Satish
कोरोनाच्या संकटाने भल्याभल्यांच्या अहंकारी आणि कपटी वृत्तीला धूळ चारली आहे. परंतु अजूनही असे बरेच महाभाग शिल्लक आहेत की जे आपल्या या दोषाला घट्ट पकडूनच पुढील आयुष्य जगण्याच्या मानसिकतेत आहेत.
अशा भ्रमित लोकांना भविष्यातील त्यांच्या आयुष्यात कोरोनापेक्षाही जास्त धोका त्यांच्या या अपप्रवृत्तीपासून असेल.
कारण दुसर्याचे सुख पाहिल्यावर यांच्या मनाला अतोनात यातना होतात आणि त्यामुळे दुसर्याच्या आयुष्यात दुःखाचा शिडकाव करण्यासाठी कटकारस्थान करण्याच्या नादात हे लोक आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ आणि आनंदी क्षणांचा उपभोग घेण्यास पुरते विसरून जातात. मात्र त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही समोरील व्यक्तीच्या वाट्याला दुःख न आल्यास अशा व्यक्ती सैरभैर होऊन आपले पुढील आयुष्य नकळतपणे दुःखाच्या खाईत लोटण्यास स्वतःच जबाबदार ठरतात.
' काळाच्या आघाताने तरी
कपटवृत्तीला त्यागावे,
ज्याला नाही जमले त्याने
परिणाम त्याचे मग भोगावे '
✒ K. Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...