Wednesday, February 24, 2021

प्रवास

आयुष्याचा प्रवास हा

अडथळे रस्त्यामध्ये अगणित,

पार करूनी त्यांना अलगद

पुढे निघालो मीही ऐटीत

✒ K. Satish





Tuesday, February 23, 2021

वंदन थोर समाजसुधारकांना

थोर समाजसुधारक - संत गाडगेबाबा


पैशाची चणचण असेल तर जेवणाची भांडी विका.

दागदागिने खरेदी करू नका. तुटक्या फुटक्या घरात रहा. पण मुलांना शिक्षण अवश्य द्या.


शिक्षणाविषयी अतिशय मार्मिक टिप्पणी करणारे,

शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारे, शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून सांगणारे,

मानवतावादी विचारांचा प्रसार करून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला चढवणारे,

स्वच्छतेचे महत्त्व लोकांना आपल्या कृतीद्वारे पटवून सांगणारे अखंड भारतातील महान संत - थोर समाजसुधारक

' संत गाडगेबाबा '

यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



Monday, February 22, 2021

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या लेकीस, सिद्धीस

जन्मदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा...


आनंदाचा क्षण हा आला

जन्मदिन हा तुझा गं आला,

धकाधकीच्या जीवनात या

आनंदाचा वर्षाव झाला 


प्रगतीपथावर जावे तू गं

स्वतःस घडवत न्यावे तू गं,

येथील अडथळे अगणित तरीही

अद्वितीय कार्य करावे तू गं 


क्षमता आहे तुझ्यात मोठी

जिद्द, चिकाटीदेखील मोठी,

आकार देऊन जीवनास तू

कार्य करावे देशासाठी

✒ K. Satish





Friday, February 19, 2021

प्रजाप्रतिपालक रयतेचे राजे

आजच्या या मंगलदिनी माझ्या या रयतेच्या राजाचा जन्म झाला.

छत्रपती शिवरायांचे आचार-विचार सर्वच खरोखरीच प्रेरणादायी आहेत.

आजच्या या तरूण पिढीने त्यांच्या नावाचा नुसता जयघोष करण्याऐवजी त्यांचे आचार-विचार आपल्या नसानसांत भिनवावे...

हाच खर्‍या अर्थाने त्यांना मानाचा मुजरा ठरेल...!!!


दुश्मन आणि कावेबाज

सोडून कोणालाच भय वाटले नाही

माझ्या या राजाच्या राज्यात,


स्वतंत्र भारताची लोकशाही

तेव्हाही नांदत होती

माझ्या शिवरायांच्या स्वराज्यात...!!!


अखंड विश्वात खर्‍या अर्थाने

रयतेचा राजा ठरलेल्या

छत्रपती शिवाजी महाराजांना

तमाम रयतेकडून

त्रिवार मानाचा मुजरा...!!!

✒ K. Satish 



Wednesday, February 17, 2021

विचारांवर नियंत्रण हवे

द्विधा मनस्थितीतील माणसे सैरभैर होऊन जातात.

अशा सैरभैर झालेल्या माणसांची विचार करण्याची शक्तीच कमी होऊन बसते.

आणि मग अशी माणसे संघटित होणे अशक्यच......


' संगठन नाही तर संघर्ष नाही

संघर्ष नाही तर न्याय नाही

आणि अन्याय सहन करून जगण्याला

खरंच काही अर्थ नाही.......'


म्हणून विचारांवर नियंत्रण ठेवून बौद्धिक क्षमता वाढवायला हवी.....

✒ K. Satish



Saturday, February 13, 2021

व्हॅलेन्टाइन

माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.

आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.

✒ K. Satish



Friday, February 12, 2021

चुंबन

मनातील आपलेपणाची भावना शब्दांविना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे चुंबन. 

प्रियकर आणि प्रेयसीच्या चुंबनापेक्षाही

बालपणी आई वडिलांनी घेतलेले आपले चुंबन आणि वृद्धापकाळात आपल्या मुलांनी घेतलेले आपले चुंबन हे अधिक सुखावणारे असते.

✒ K. Satish







कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...