आजच्या या मंगलदिनी माझ्या या रयतेच्या राजाचा जन्म झाला.
छत्रपती शिवरायांचे आचार-विचार सर्वच खरोखरीच प्रेरणादायी आहेत.
आजच्या या तरूण पिढीने त्यांच्या नावाचा नुसता जयघोष करण्याऐवजी त्यांचे आचार-विचार आपल्या नसानसांत भिनवावे...
हाच खर्या अर्थाने त्यांना मानाचा मुजरा ठरेल...!!!
दुश्मन आणि कावेबाज
सोडून कोणालाच भय वाटले नाही
माझ्या या राजाच्या राज्यात,
स्वतंत्र भारताची लोकशाही
तेव्हाही नांदत होती
माझ्या शिवरायांच्या स्वराज्यात...!!!
अखंड विश्वात खर्या अर्थाने
रयतेचा राजा ठरलेल्या
छत्रपती शिवाजी महाराजांना
तमाम रयतेकडून
त्रिवार मानाचा मुजरा...!!!
✒ K. Satish