माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.
आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.
✒ K. Satish
माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.
आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.
✒ K. Satish
मनातील आपलेपणाची भावना शब्दांविना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे चुंबन.
प्रियकर आणि प्रेयसीच्या चुंबनापेक्षाही
बालपणी आई वडिलांनी घेतलेले आपले चुंबन आणि वृद्धापकाळात आपल्या मुलांनी घेतलेले आपले चुंबन हे अधिक सुखावणारे असते.
✒ K. Satish
प्रेमाने दिलेल्या आलिंगनात
अशी जादू असते की, समोरील व्यक्ती
कितीही मोठे दुःख असो वा राग असो...
अगदी क्षणात विसरून जाऊ शकते.
✒ K. Satish
जीवापाड हे प्रेम तुझ्यावरी
तुझ्यात माझा जीव गुंततो,
आस तुझी अन् ध्यास तुझा मज
तुजविन जीव हा व्याकूळ होतो.
✒ K. Satish
कधी संपेल हा संघर्ष जीवनाचा
अन्यायाला मातीत गाडण्याचा,
झुंज देऊनी अन्यायाशी
मार्ग शोधतो मी न्यायाचा
✒ K. Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...