गुलाबपुष्पे रंगीबेरंगी
भाव निराळे दर्शविती,
मैत्री, प्रेम नि विश्वासाचे
शब्दांविन दर्शन घडविती
✒ K. Satish
गुलाबपुष्पे रंगीबेरंगी
भाव निराळे दर्शविती,
मैत्री, प्रेम नि विश्वासाचे
शब्दांविन दर्शन घडविती
✒ K. Satish
माता रमाई
कर्तव्यनिष्ठ, स्वाभिमानी आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण...
ज्यांनी असंख्य संकटांना तोंड देत असतानादेखील
दीन दुबळ्यांच्या हक्कांसाठी लढणार्या बाबासाहेबांना आपल्या दुःखाची थोडीही झळ पोहोचू दिली नाही.
आज बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात असंख्य
दीन दुबळ्यांसाठीच नव्हे, आपल्या भारत देशासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी जे काही महान योगदान दिले आहे. ते फक्त या माऊलीमुळेच शक्य झाले.
अशा असंख्य दीन दुबळ्यांच्या आईला...
माता रमाईला कोटी कोटी वंदन...!!!
✒ K. Satish
अन्यायकारक घटनांचा अनुभव घेत असताना बहुतांशी लोकांना वाटत असते की, आपल्यावर अन्याय होत आहे आणि त्याविरुद्ध क्रांती घडायला हवी आणि अन्यायाचा बीमोड व्हायला हवा.
परंतु या क्रांतीच्या लढ्यातील क्रांतीकारक मात्र दुसऱ्याच्या घरात जन्मलेला हवा. आणि जर हा लढा यशस्वी झाला आणि हक्कांची लढाई जिंकली तर त्या हक्कांच्या जोरावर प्रगती करणार्या आर्थिक संपन्नता लाभलेल्या व्यक्ती, उच्चशिक्षण प्राप्त झालेल्या व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योगपती, नावाजलेले कलाकार या सर्वांचा मात्र आपल्या घरी उदय व्हावा.
हा विचार बदलून सर्वजण संघटित राहिल्यास अन्याय करणारा देखील धाडस करणार नाही.
महापुरुषांचे, क्रांतिकारकांचे नुसते गुणगान गाऊन त्यांना अभिवादन करण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या. व अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा वारसा पुढे अखंड सुरू ठेवा. तेव्हाच त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही असे म्हणता येईल.
नाहीतर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची संख्यादेखील या जगात कमी नाही.
छत्रपती शिवाजीमहाराज, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक महापुरुषांचा नुसता मुखातून जयजयकार करण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची तळमळ अंगी भिनवल्यास खर्या अर्थाने आपणास मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक होईल.
✒ K. Satish
फुलाचा मनमोहक सुगंध चोहीकडे दरवळत असतो. त्याचे नैसर्गिक सौंदर्य कोणालाही मोहित करते. त्याच्या एखाद्याजवळ असण्यानेदेखील ते बाळगणाऱ्याच्या सौंदर्यात व उत्साहात मोठी भर पडते. आणि त्याच्या मनमोहक सुगंधाचा व त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा महिमा त्याला स्वतःहून इतरांना सांगावा लागत नाही. सर्व लोक त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याचा मनमोहक सुगंध आसमंतात असा मिसळून जातो की, लोक स्वतःहून त्याच्या सानिध्यात राहण्यास उत्सुक असतात. लोक आपणहून त्याच्या चांगुलपणाची आणि चांगल्या गुणांची चर्चा करीत असतात. व त्याची ही जनमानसांत सुरू असलेली चर्चा त्याच्या नकळतही चोहीकडे चर्चिली जात असते.
माणसाचे कर्तृत्वदेखील असेच असायला हवे. आपले वागणे, बोलणे, समाजासाठी झटण्याची तळमळ, निस्वार्थीपणा, कष्टाळूपणा, निर्भीड बाणा, प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर आपण आपले व्यक्तिमत्त्व इतके सुंदर, बहारदार बनवायला हवे की, आपला सहवास, आपले मार्गदर्शन लोकांना हवेहवेसे वाटावे. आपल्या कार्याची स्तुती आपल्याला आपल्या तोंडून सांगायला लागू नये. आपल्या सत्कार्याची अनुभूती लोकांना येऊन त्यांनीच त्याची चर्चा करावी. अशा कीर्तीचे मोल खरोखर अगदी अनमोल आहे.
✒ K. Satish
अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी
अन् ज्ञानाच्या जोरावर,
कर्तृत्व करावे असे की तुमचे
व्हावे नाव ते अजरामर...!!!
✒ K. Satish
माणसांच्या मनांची सफाई व्हावी,
सुवचने मुखातून नाही तर मनातून यावी,
इतरांनीही आदर्श घ्यावा
अशीच कृती सर्वांच्या हातून घडावी...
✒ K. Satish
जग हे सारे कुटुंब आमुचे
हितचिंतक किती इथे भेटती,
रक्तांच्या नात्यांहूनी श्रेष्ठ
आपुलकीचे नाते जोडती
✒ K. Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...