Tuesday, January 12, 2021

राजमाता जिजाऊ

दिला आम्हा तो राजा धुरंधर

स्वराज्याचे बीज पेरले मनी,

धन्य त्या माता जिजाऊ त्यांना

नमन मी करतो हृदयातूनी....!!!


रयतेचे राजे ' छत्रपती शिवाजी महाराज ' यांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरून त्यांच्यावर गुणवान, चारित्र्यवान, पराक्रमी, बुद्धिमान, रयतेबद्दल प्रेम व आदराची भावना निर्माण करून त्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी उत्तम संस्कार करणार्‍या

राष्ट्रमाता....राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....!!!

✒ K. Satish










Sunday, January 10, 2021

अरे स्वार्थी माणसा

गाडी हवीय पण प्रदूषण नको

फळे हवीत पण झाडे नको

पैसा हवाय पण कष्ट नको

संपत्ती हवीय पण म्हातारे आई वडील नको

स्वास्थ्य हवंय पण व्यायाम करणे नको

फक्त सुख हवंय पण दुःख अजिबात नको


किती स्वार्थी झालास रे माणसा,

तुला उपभोग तर हवाय

पण कशाचीही जपणूक मात्र करायला नको...

✒ K. Satish



Sunday, January 3, 2021

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्त्रियांच्या जीवनातील अंधकार मिटविला

ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या मस्तकी पाडिला,

गुलामगिरीत जगणार्‍या असंख्य स्त्रियांना

शिक्षित करूनी नवा इतिहास घडविला


स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसेविका

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

यांच्या पावन स्मृतीस त्यांच्या जयंतीनिमित्त 

विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish




Thursday, December 31, 2020

नववर्षाभिनंदन म्हणजे काय ?

गतवर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घ्यावा...


त्यातील वाईट, कष्टदायी, वेदनादायी घटनांमधून पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य तो बोध घ्यावा व त्या कटू आठवणींना उराशी न बाळगता कायमची तिलांजली द्यावी.


मागील कालखंडात बर्‍याच चांगल्या वाईट व्यक्तींशी संबंध आला असेल, त्यातील स्वार्थी मतलबी हितशत्रूंना ओळखून आपल्या पुढील आयुष्यात स्थान देऊ नये...

परंतु, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणार्‍या, तुम्हाला सतत प्रोत्साहन देणार्‍या आणि तुमच्या वाईट प्रसंगातही तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या तुमच्या हितचिंतकांना कधीही गमावू नये...


या पृथ्वीतलावर आपल्याला जो मानवजन्म मिळाला आहे ती आपल्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. तिच्या अनुषंगाने आयुष्यात येणार्‍या प्रत्येक वळणावर असे काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगावी की, ' मरावे परी किर्तीरूपी उरावे ' ही म्हण आपल्याला तंतोतंत लागू होईल.


आयुष्य हे खूप सुंदर आहे... चला त्याला नव्या उमेदीने अतिसुंदर बनवण्याचा संकल्प करूया.

नवीन वर्षात आपल्या देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी हिरीरीने काहीतरी अद्वितीय करून दाखविण्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त व्हावी हीच माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून व माझ्या सर्व हितचिंतक मित्रांकडून आपणा सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा....!!!!

    धन्यवाद...!!! 🙏🏻

✒ K. Satish





Wednesday, December 30, 2020

कौशल्य

छोट्या समस्यांनादेखील

जबाबदारीने हाताळणे आवश्यक असते,

कारण थोडी जरी चूक झाली तर मग

परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसते

✒ K. Satish



Monday, December 28, 2020

मानाचा मुजरा

अपयशाच्या काळोखातूनी घेतली उंच भरारी

पादाक्रांत केली यशाची शिखरे सारी


टाटा परिवारामध्ये आहे त्यांना मानाचे स्थान

या परिवाराचा प्रत्येक सदस्य गातो त्यांचे गुणगान


मान देती कर्मचार्‍यांना ते मानत नाहीत गुलाम

म्हणूनच सारी दुनिया करते झुकूनी त्यांना सलाम


टाटा समूहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एक अनमोल रत्न....

यशाच्या शिखरावर असतानाही त्याचा थोडादेखील अहंकार न बाळगता सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून देशसेवा व माणुसकी जपणारे सर्व भारतीयांचे लाडके आदरणीय श्री. रतन टाटा साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व टाटा मोटर्स परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा...!!!

✒ K.Satish



Sunday, December 27, 2020

लोभसवाणे हास्य

हातात तुझिया हात हा माझा

तुझ्यात माझा जीव गुंतला,

लोभसवाणे हास्य पाहूनी

स्वर्गसुखाचा अनुभव आला

✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...