रबराच्या ताणाची मर्यादा ही ठरलेली असते. त्या मर्यादेत त्याचा वापर करून घेतल्यास तो अधिक काळ निरंतर आपल्या उपयोगी पडू शकतो. परंतु , त्याच्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण दिल्यास त्याच्या मर्यादेचा अंत होऊन तो तुटून पुन्हा कधीच तुमच्या कामी येत नाही आणि तुटताना त्याच्या फटक्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, एखाद्या हुकूमशहाने आपल्या गुलामांवर वर्चस्व ठेवण्याकरिता त्यांना किती त्रास द्यावा अथवा त्यांच्यावर किती प्रमाणात अन्याय करावा ह्याची मर्यादा त्याने ठरवायला हवी. एका मर्यादेपर्यंत गुलामालाही गुलामीची जाणीव होत नाही किंवा तो त्या गुलामीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नाही.
परंतु , हुकूमशहाने अतिमाज केल्यास आणि त्यांच्या सहनशक्तीपलीकडे अत्याचार करून त्यांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या छळास कंटाळून त्यांना बंड करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही आणि मग अशा विद्रोहाला सामोरे जाण्याची ताकद कितीही मोठ्या हुकूमशहात उरत नाही.
त्यामुळे पैसा आणि सत्तेचा माज करून लोकांना गुलाम बनविण्यापेक्षा, ह्याच पैसा आणि सत्तेचा वापर जनतेच्या उद्धारासाठी केल्यास जनता स्वतःहून हसतमुखाने तुमची अनुयायी बनण्यास तयार होईल.
ह्या पृथ्वीतलावर असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे आणि प्रत्येकाची जीवनशैली निरनिराळी आहे. त्यातल्या त्यात मनुष्यप्राणी हा सर्वात निराळा आहे. त्यामुळे माणसाला माणसाप्रमाणे वागणूक देणे हे प्रत्येक मनुष्यप्राण्याचे परमकर्तव्य आहे. आणि हे कोणीही विसरता कामा नये.
माज सोडून सत्कार्य करा,
ताकद तुमची लावून पणाला
गोरगरिबांचा उद्धार करा....!!!
धन्यवाद........!!!
✒K. Satish