Monday, December 7, 2020

माणसं ओळखण्याची कला

चांगल्या माणसांच्या रागावण्याचा राग मानायचा नसतो...

कारण,

त्यामागे आपला मार्ग चुकू नये हाच उद्देश असतो.


गोड बोलून घात करणार्‍या स्वार्थी लोकांपेक्षा....

तोंडावर रागावणारे परंतु मनातून आपले हित पाहणारे हितचिंतक बरे


माणसं ओळखणे ही देखील एक कला आहे.

आणि ज्याला ती जमली तो नकळत होणाऱ्या मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.

✒ K. Satish



Saturday, December 5, 2020

आभाळं फाटले, धरणी दुभंगली

आभाळं फाटले, धरणी दुभंगली

जेव्हा मावळला तो सूर्य

काळरात्र ही जागली


विश्ववंदनीय

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,

परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस

विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish





Thursday, November 26, 2020

संविधान दिन

     अथक परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या संविधानाचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संविधान समितीने स्वीकारला.

     हे संविधान भारताच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, सर्व नागरिकांना न्याय - समता प्रदान करण्यासाठी, देशाचे आर्थिक धोरण व्यवस्थित राबवून देशातील समस्यांचे निराकरण करून येथील जनतेला सुखाचा श्वास घेता यावा यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
     परंतु , आजच्या घडीला ज्या राजकारण्यांना हा देश चालवण्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून बहुमुल्य अधिकार प्राप्त झाले आहेत, ते जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थापोटी या पवित्र ग्रंथाचा सर्रास गैरवापर करताना दिसताहेत.
     आणि दुर्दैव म्हणजे ज्या जनतेच्या हक्कांसाठी या संविधानाद्वारे भारत देश हा एक लोकशाहीप्रधान देश म्हणून घोषित केला गेला, ते देखील राजकीय भक्तीच्या इतके आहारी गेलेत की, आपल्या हक्कांचा बळी देत आपलेच नेते स्वतःच्या स्वार्थापोटी आपली थट्टा करीत आहेत याचे भानच त्यांना उरले नाही.
     हे संविधान जनतेचे सुजलाम - सुफलाम राष्ट्र निर्माण करण्यासाठी बनवण्यात आले होते. त्याला तोडून मोडून, आपल्या सोयीनुसार वळवून त्याची क्रूर थट्टा राज्यकर्त्यांनी चालवली आहे.
     आपल्या हक्कांची जाणीव होऊन जनतेने राज्यकर्त्यांची गुलामगिरी आणि चुकीची पाठराखण करणे सोडून त्यांच्यावर अंकुश ठेवणारा दिवस उजाडेल त्याचवेळी आपल्या संविधानाचा खर्‍या अर्थाने सन्मान होईल...

✒ K. Satish


Wednesday, November 25, 2020

चांगला बदल हवा...

 एखादी क्रांती करण्यासाठी

त्याग करणे गरजेचे आहे,


अन्यायाचा बीमोड करण्यासाठी

निर्भीडपणे लढा देणे गरजेचे आहे,


घाण साफ करण्यासाठी

घाणीमध्ये उतरणे गरजेचे आहे,


आणि म्हणूनच

राजकारण कितीही घाणेरडे असले तरी

जनतेला तिचे हक्क मिळवून देण्यासाठी

चांगल्या व्यक्तींनी राजकारणात पडणेही तितकेच गरजेचे आहे.

✒ K. Satish



Monday, November 23, 2020

हाच माझा ध्यास

 आवाज माझा नसला तरी

शब्द माझे असावेत,

शब्दांना असावी धार अशी की,

ऐकणाऱ्याच्या मनी ठसावेत

✒ K. Satish






Saturday, November 21, 2020

विश्वासार्हता

तुम्हाला तुमच्यावरील विश्वास अबाधित राहून तुमचे ऋणानुबंध दीर्घकाळ टिकावे अशी इच्छा असेल तर,

एक सोपे सूत्र आत्मसात करा......

कधीही खोटे बोलू नका...

✒ K. Satish






Sunday, November 1, 2020

सौंदर्याची परिभाषा

 आपण जन्माला आल्यानंतर कसे दिसणार हे काही आपल्या हातात नसते.
त्यामुळे आपल्या कुरूपपणाविषयी न्यूनगंड बाळगण्यात अथवा आपल्या सौंदर्यावर गर्व करण्यात काय अर्थ आहे ?

खरा कस तर तेव्हा लागतो,
जेव्हा आपण आपले सद्गुण वाढवून दुर्गुणांवर विजय मिळवतो. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, बुद्धिचातुर्याने, निस्वार्थी वृत्तीने व स्वतः दुःखी असूनही आपल्या चेहर्‍यावर अथवा देहबोलीतून कोणालाही त्या दुःखाची जाणीव होऊ न देता इतरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्याच्या कौशल्याने लोकांची मने जिंकून आपल्या कुरूपतेला सौंदर्यात बदलण्यात आणि सौंदर्याला अतिसुंदर बनवण्यात यशस्वी होतो.

                                                            ✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...