Sunday, August 2, 2020

स्वच्छता और सामाजिक दूरी

 स्वच्छता

स्वच्छता है तो जिन्दगी है ।
जिन्दगी है तो जहाँ है।
और इस जहाँ को खुशहाल बनाना
हम सभी के हाथ में है।

                       

सामाजिक दूरी

सामाजिक दूरी से ही होगी
कोरोना की लडाई पूरी ।

  • इसलिए स्वच्छता का ध्यान रखके कोरोना से बचना होगा ।
  • उसी के साथ सामाजिक दूरी भी बनाए रखना होगा ।

                                                          ✒ K. Satish

सुखद कैद

धकाधकीच्या आयुष्यात या
थोडी उसंत ही मला घावली,
परिस्थितीने ओढवलेली
सुखद कैद ही मला भावली

K. Satish



स्वयंशिस्त

पाचपेक्षा अधिक माणसे
होऊ नका गोळा,
शासनाचे नियम पाळा
कोरोनाचा संसर्ग टाळा

 K.Satish




मानाचा सलाम

     आजच्या या आधुनिक युगात सर्व जीवसृष्टीवर कोणते संकट कधी 'आ' वासून पुढे उभे राहील याचा काहीच भरवसा नाही.
     असेच एक संकट या कोरोना व्हायरसच्या रूपाने जगावर ओढवले आहे. या संकटाने सर्वांना पुन्हा एकदा हे दाखवून दिले की, मानवाच्या जीवापुढे पैशाचा अहंकार, धर्माचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, पदाचा अहंकार हा शून्य आहे. त्यामुळे मानवाने मानवाशी मानवाप्रमाणेच वागावे व एकजुटीने संकटाला तोंड देऊन या सृष्टीला जपावे.
     आणि या सर्व परिस्थितीत मानवजातीवरचे हे संकट दूर करण्यास मोलाचे योगदान देणार्‍या डाॅक्टर्स, नर्स, पोलिस, सैनिक, वैज्ञानिक, सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व मंडळी जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने या संकटाचा सामना करण्यासाठी लढत आहेत. त्या सर्वांना जगातील सर्व नागरिकांतर्फे मानाचा सलाम...!!!

                                                                ✒ K. Satish

कोरोना

कोरोनाच्या भीतीने
सगळेच बसलेत घरी,
उद्दीष्ट ठरले सर्वांचे
थोपवू ही महामारी


                                           ✒ K. Siddhi

व्हायरस

मानवाच्या चुकीच्या कृतीने
अनेक व्हायरस जन्मास घातले,
आता झाली अशी अवस्था
त्यांनीच मानवांचे प्राण घेतले

K. Satish

 

Saturday, August 1, 2020

विनम्र अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

थोर साहित्यसम्राट, क्रांतिकारी लेखक-कवी, सामान्य कष्टकरी जनतेमध्ये समाजपरिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी
पोवाडे, लावण्या, गीते, या काव्यप्रकारांचा उत्कृष्ट वापर करून
लोकांच्या मनाला हात घालणारे
थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

लावणी, शाहिरी, पोवाडा
लोककला होत्या त्यांना अवगत,
घेऊनी निघाले लढण्यासाठी
परिवर्तनाचा विचार सोबत

'जग बदल घालूनी घाव
सांगूनी गेले मज भिमराव',
गीत लिहूनी बाबांवरती
घेतला सार्‍यांच्या मनाचा ठाव

'ये आजादी झूठी है
देश की जनता भूखी है',
नारा त्यांचा मोलाचा
केला विचार अगदी खोलाचा

                                                   K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...