नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करा जपून
तेव्हाच सगळी जीवसृष्टी राहील बघा टिकून,
जरूर करा प्रगती पण संपवू नका सृष्टी
भावी पिढीसाठी थोडी ठेवा दूरदृष्टी
✒ K. Satish
नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करा जपून
तेव्हाच सगळी जीवसृष्टी राहील बघा टिकून,
जरूर करा प्रगती पण संपवू नका सृष्टी
भावी पिढीसाठी थोडी ठेवा दूरदृष्टी
✒ K. Satish
वृक्षांपासूनी बनतो कागद
कागदापासूनी पुस्तक,
त्यातून मिळते ज्ञान असे की
तल्लख होते मस्तक
जागतिक पुस्तकदिनाच्या
सर्व आबालवृद्ध नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा...!!!
झाडे लावा
झाडे जगवा...!!!
✒ K. Satish
सर्व रसिकजनांस कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात आपल्या शब्दांची व आवाजाची जादू ओतणारे, 'मस्का' चित्रपटातील 'बया' या गाण्याचे पार्श्वगायक, 'डॅडी', 'बाॅईज २' या चित्रपटांचे गायक, दोस्तीगीरी चित्रपटाचे गीतकार, 'चौर्य' चित्रपटाचे कोरियोग्राफर तसेच लोककलेचे गाढे अभ्यासक व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची लोककला १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित केलेल्या 'दि वर्ल्ड एक्स्पो २०२०' या महोत्सवात झळकणार आहे.
त्यातही अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे यात आमचे बंधू व आमच्या लोकगीतांना श्रवणीय करण्यासाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे असे 'बालगंधर्व परिवार पुरस्कार' विजेते, महाराष्ट्रातील उत्कृष्ट ढोलकीवादक श्री. नितीन प्रधान हे आपल्या वादनकलेचे योगदान देणार आहेत.
या महोत्सवात आपली कला सादर करून आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन सातासमुद्रापार असलेल्या रसिकजनांना घडवून देण्यासाठी सज्ज झालेल्या या सर्व गुणी कलावंतांस मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 💐
✒ K. Satish
लाडक्या लेकीस, सिद्धीस
जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा...
आनंदाचा क्षण हा आला
जन्मदिन हा तुझा गं आला,
धकाधकीच्या जीवनात या
आनंदाचा वर्षाव झाला
प्रगतीपथावर जावे तू गं
स्वतःस घडवत न्यावे तू गं,
येथील अडथळे अगणित तरीही
अद्वितीय कार्य करावे तू गं
क्षमता आहे तुझ्यात मोठी
जिद्द, चिकाटीदेखील मोठी,
आकार देऊन जीवनास तू
कार्य करावे देशासाठी
✒ K. Satish
तिळगुळाच्या गोडीने स्नेहबंध, ऋणानुबंध वाढायला हवेत....
माणसा माणसांत द्वेषभावना संपून प्रेमभाव वाढायला हवा...
तरच
संक्रांतीचा फायदा आहे.
ह्या संक्रांतीला सगळीकडे सौख्य नांदावे हीच प्रार्थना....
✒K.Satish
गतवर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घ्यावा...
त्यातील वाईट, कष्टदायी, वेदनादायी घटनांमधून पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य तो बोध घ्यावा व त्या कटू आठवणींना उराशी न बाळगता कायमची तिलांजली द्यावी.
मागील कालखंडात बर्याच चांगल्या वाईट व्यक्तींशी संबंध आला असेल, त्यातील स्वार्थी मतलबी हितशत्रूंना ओळखून आपल्या पुढील आयुष्यात स्थान देऊ नये...
परंतु, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणार्या, तुम्हाला सतत प्रोत्साहन देणार्या आणि तुमच्या वाईट प्रसंगातही तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या तुमच्या हितचिंतकांना कधीही गमावू नये...
या पृथ्वीतलावर आपल्याला जो मानवजन्म मिळाला आहे ती आपल्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. तिच्या अनुषंगाने आयुष्यात येणार्या प्रत्येक वळणावर असे काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगावी की, ' मरावे परी किर्तीरूपी उरावे ' ही म्हण आपल्याला तंतोतंत लागू होईल.
आयुष्य हे खूप सुंदर आहे... चला त्याला नव्या उमेदीने अतिसुंदर बनवण्याचा संकल्प करूया.
नवीन वर्षात आपल्या देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी हिरीरीने काहीतरी अद्वितीय करून दाखविण्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त व्हावी हीच माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून व माझ्या सर्व हितचिंतक मित्रांकडून आपणा सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा....!!!!
धन्यवाद...!!! 🙏🏻
✒ K. Satish
अपयशाच्या काळोखातूनी घेतली उंच भरारी
पादाक्रांत केली यशाची शिखरे सारी
टाटा परिवारामध्ये आहे त्यांना मानाचे स्थान
या परिवाराचा प्रत्येक सदस्य गातो त्यांचे गुणगान
मान देती कर्मचार्यांना ते मानत नाहीत गुलाम
म्हणूनच सारी दुनिया करते झुकूनी त्यांना सलाम
टाटा समूहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एक अनमोल रत्न....
यशाच्या शिखरावर असतानाही त्याचा थोडादेखील अहंकार न बाळगता सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून देशसेवा व माणुसकी जपणारे सर्व भारतीयांचे लाडके आदरणीय श्री. रतन टाटा साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व टाटा मोटर्स परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा...!!!
✒ K.Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...