Showing posts with label कृतज्ञता ( Respect ). Show all posts
Showing posts with label कृतज्ञता ( Respect ). Show all posts

Tuesday, February 14, 2023

व्हॅलेन्टाइन

माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.

आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.

✒ K.Satish




Wednesday, January 5, 2022

निस्वार्थ जनसेवेचे मूर्तिमंत उदाहरण...'अनाथांची माय'

अनाथांची माय
थोर समाजसेविका, पद्मश्री
वंदनीय सिंधुताई सपकाळ यांना
सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

'स्वतःसाठी सगळेच जगतात पण जीवनातील खरा आनंद आणि त्याचा खरा मतितार्थ लपला आहे इतरांसाठी झिजण्यात'
जीवनाच्या या सत्वचनाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या, सर्वांना वंदनीय व 'अनाथांची माय' अशी सर्व जनमानसांत ओळख असलेल्या.....खऱ्या अर्थाने सर्व विश्वाच्या माय असलेल्या थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!!

काळाचे सोसले घाव
तरी हिम्मत ना हारली जिने,
झळा सोसूनी दुःखाच्या
इतरांना तारले तिने

जीवन वाहिले इतरांसाठी
लाखो वासरांची झाली गाय, 
अनंतात ती विलीन जाहली
अनाथांची हो माय

✒ K. Satish





Friday, July 23, 2021

शतशः नमन

पैशाच्या बाजारात न भरकटता आपल्या शिष्यांच्या ज्ञानाची घागर तुडुंब भरण्याचे आपले परमकर्तव्य अगदी मनापासून पार पाडणाऱ्या सर्व आदरणीय गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन...!!!

✒ K. Satish



Tuesday, February 23, 2021

वंदन थोर समाजसुधारकांना

थोर समाजसुधारक - संत गाडगेबाबा


पैशाची चणचण असेल तर जेवणाची भांडी विका.

दागदागिने खरेदी करू नका. तुटक्या फुटक्या घरात रहा. पण मुलांना शिक्षण अवश्य द्या.


शिक्षणाविषयी अतिशय मार्मिक टिप्पणी करणारे,

शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारे, शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून सांगणारे,

मानवतावादी विचारांचा प्रसार करून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला चढवणारे,

स्वच्छतेचे महत्त्व लोकांना आपल्या कृतीद्वारे पटवून सांगणारे अखंड भारतातील महान संत - थोर समाजसुधारक

' संत गाडगेबाबा '

यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



Friday, February 19, 2021

प्रजाप्रतिपालक रयतेचे राजे

आजच्या या मंगलदिनी माझ्या या रयतेच्या राजाचा जन्म झाला.

छत्रपती शिवरायांचे आचार-विचार सर्वच खरोखरीच प्रेरणादायी आहेत.

आजच्या या तरूण पिढीने त्यांच्या नावाचा नुसता जयघोष करण्याऐवजी त्यांचे आचार-विचार आपल्या नसानसांत भिनवावे...

हाच खर्‍या अर्थाने त्यांना मानाचा मुजरा ठरेल...!!!


दुश्मन आणि कावेबाज

सोडून कोणालाच भय वाटले नाही

माझ्या या राजाच्या राज्यात,


स्वतंत्र भारताची लोकशाही

तेव्हाही नांदत होती

माझ्या शिवरायांच्या स्वराज्यात...!!!


अखंड विश्वात खर्‍या अर्थाने

रयतेचा राजा ठरलेल्या

छत्रपती शिवाजी महाराजांना

तमाम रयतेकडून

त्रिवार मानाचा मुजरा...!!!

✒ K. Satish 



Saturday, February 13, 2021

व्हॅलेन्टाइन

माझ्यासारख्या कवी/गीतकारासाठी व्हॅलेन्टाइन म्हणजे त्याची लेखणी व त्यातून अवतरणारे शब्द.

आणि या माझ्या व्हॅलेन्टाइनला सदैव ताजेतवाने व प्रफुल्लित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे.

✒ K. Satish



Friday, January 15, 2021

भारतीय सैन्य दिवस

हा देह तुझाच जाहला

हा प्राण तुझ्यावर वाहिला,

हे प्रिय माझ्या देशा

तु माझ्या नसानसात सामावला


मरताना पण हसतो

तो देशाचा सैनिक असतो,

देशासाठी आपुल्या तो

अविरतपणे लढत असतो


प्राण पणाला लावून देशाचे आणि सर्व देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिक वीर वीरांगनांना

मानाचा सलाम

✒ K. Satish






Sunday, August 2, 2020

मानाचा सलाम

     आजच्या या आधुनिक युगात सर्व जीवसृष्टीवर कोणते संकट कधी 'आ' वासून पुढे उभे राहील याचा काहीच भरवसा नाही.
     असेच एक संकट या कोरोना व्हायरसच्या रूपाने जगावर ओढवले आहे. या संकटाने सर्वांना पुन्हा एकदा हे दाखवून दिले की, मानवाच्या जीवापुढे पैशाचा अहंकार, धर्माचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, पदाचा अहंकार हा शून्य आहे. त्यामुळे मानवाने मानवाशी मानवाप्रमाणेच वागावे व एकजुटीने संकटाला तोंड देऊन या सृष्टीला जपावे.
     आणि या सर्व परिस्थितीत मानवजातीवरचे हे संकट दूर करण्यास मोलाचे योगदान देणार्‍या डाॅक्टर्स, नर्स, पोलिस, सैनिक, वैज्ञानिक, सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व मंडळी जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने या संकटाचा सामना करण्यासाठी लढत आहेत. त्या सर्वांना जगातील सर्व नागरिकांतर्फे मानाचा सलाम...!!!

                                                                ✒ K. Satish

Sunday, July 5, 2020

गुरूजनांचे आभार 🙏

अनेक गुरूजन मला मिळाले
आयुष्याच्या वळणावर,
लहान असो की मोठे असो
आहेत मानाच्या स्थानावर

जोवर आहे आयुष्य आपुले
प्रत्येकाने शिकत रहावे,
मिळवलेल्या ज्ञानामधूनी
इतरांना ज्ञान वाटत जावे

                                ✒ K. Satish

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...