अहंकार आणि हट्टीपणा सद्सद्विवेक बुद्धीला मारून टाकतात. आणि मग मनुष्याची वाटचाल अधोगतीकडे होण्यास सुरुवात होते. अशावेळी मनुष्य आपल्या वागण्याने आपले हित जोपासणार्या व्यक्तींना सुद्धा किंमत देणे बंद करतो, किंबहुना त्यांचा अपमान करणेही सोडत नाही.
आणि मग मोठ्या नशीबाने त्याच्या आयुष्यात आलेली ही बोटावर मोजण्याइतकी चांगली माणसेही अगदी नाईलाजाने त्याच्या आयुष्यातून दूर निघून जातात.
मग कधीतरी जीवनातील एखाद्या कठीण समयी त्याला ह्या व्यक्तींची प्रकर्षाने उणीव भासते. त्यावेळी मात्र त्याच्या हाती हळहळ आणि पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही.
म्हणूनच आपल्यातील अहंकार आणि हट्टीपणाला वेळीच आवर घालायला शिकले पाहिजे, नाहीतर या सुंदर जगामध्ये अगदी नशीबाने तुमच्या आयुष्यात आलेल्या थोड्या थोडक्या चांगल्या माणसांनाही तुम्ही गमावून बसाल.
आणि मग ह्या स्वार्थाने भरलेल्या दुनियेत अनेक अडचणींना सामोरे जाताना व्यथित होऊन तुमचे आयुष्य कधी संपून जाईल हे तुम्हाला कळणार देखील नाही...

✒ K. Satish
No comments:
Post a Comment