Tuesday, February 2, 2021

फुलासम दरवळावे कर्तृत्व आपुले

      फुलाचा मनमोहक सुगंध चोहीकडे दरवळत असतो. त्याचे नैसर्गिक सौंदर्य कोणालाही मोहित करते. त्याच्या एखाद्याजवळ असण्यानेदेखील ते बाळगणाऱ्याच्या सौंदर्यात व उत्साहात मोठी भर पडते. आणि त्याच्या मनमोहक सुगंधाचा व त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा महिमा त्याला स्वतःहून इतरांना सांगावा लागत नाही. सर्व लोक त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याचा मनमोहक सुगंध आसमंतात असा मिसळून जातो की, लोक स्वतःहून त्याच्या सानिध्यात राहण्यास उत्सुक असतात.  लोक आपणहून त्याच्या चांगुलपणाची आणि चांगल्या गुणांची चर्चा करीत असतात. व त्याची ही जनमानसांत सुरू असलेली चर्चा त्याच्या नकळतही चोहीकडे चर्चिली जात असते.

     माणसाचे कर्तृत्वदेखील असेच असायला हवे. आपले वागणे, बोलणे, समाजासाठी झटण्याची तळमळ, निस्वार्थीपणा, कष्टाळूपणा, निर्भीड बाणा, प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर आपण आपले व्यक्तिमत्त्व इतके सुंदर, बहारदार बनवायला हवे की, आपला सहवास, आपले मार्गदर्शन लोकांना हवेहवेसे वाटावे. आपल्या कार्याची स्तुती आपल्याला आपल्या तोंडून सांगायला लागू नये. आपल्या सत्कार्याची अनुभूती लोकांना येऊन त्यांनीच त्याची चर्चा करावी. अशा कीर्तीचे मोल खरोखर अगदी अनमोल आहे.

स्वतःची स्तुती स्वतः करू नये
इतरांच्या मुखातून ती व्हावी,
आपल्या सत्कार्याची महती
सर्वदूर पसरावी...!!!

✒ K. Satish



No comments:

Post a Comment

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...