अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी
अन् ज्ञानाच्या जोरावर,
कर्तृत्व करावे असे की तुमचे
व्हावे नाव ते अजरामर...!!!
✒ K. Satish
अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी
अन् ज्ञानाच्या जोरावर,
कर्तृत्व करावे असे की तुमचे
व्हावे नाव ते अजरामर...!!!
✒ K. Satish
माणसांच्या मनांची सफाई व्हावी,
सुवचने मुखातून नाही तर मनातून यावी,
इतरांनीही आदर्श घ्यावा
अशीच कृती सर्वांच्या हातून घडावी...
✒ K. Satish
जग हे सारे कुटुंब आमुचे
हितचिंतक किती इथे भेटती,
रक्तांच्या नात्यांहूनी श्रेष्ठ
आपुलकीचे नाते जोडती
✒ K. Satish
हा देह तुझाच जाहला
हा प्राण तुझ्यावर वाहिला,
हे प्रिय माझ्या देशा
तु माझ्या नसानसात सामावला
मरताना पण हसतो
तो देशाचा सैनिक असतो,
देशासाठी आपुल्या तो
अविरतपणे लढत असतो
प्राण पणाला लावून देशाचे आणि सर्व देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिक वीर वीरांगनांना
मानाचा सलाम
✒ K. Satish
तिळगुळाच्या गोडीने स्नेहबंध, ऋणानुबंध वाढायला हवेत....
माणसा माणसांत द्वेषभावना संपून प्रेमभाव वाढायला हवा...
तरच
संक्रांतीचा फायदा आहे.
ह्या संक्रांतीला सगळीकडे सौख्य नांदावे हीच प्रार्थना....
✒K.Satish
दिला आम्हा तो राजा धुरंधर
स्वराज्याचे बीज पेरले मनी,
धन्य त्या माता जिजाऊ त्यांना
नमन मी करतो हृदयातूनी....!!!
रयतेचे राजे ' छत्रपती शिवाजी महाराज ' यांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरून त्यांच्यावर गुणवान, चारित्र्यवान, पराक्रमी, बुद्धिमान, रयतेबद्दल प्रेम व आदराची भावना निर्माण करून त्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी उत्तम संस्कार करणार्या
राष्ट्रमाता....राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....!!!
✒ K. Satish
गाडी हवीय पण प्रदूषण नको
फळे हवीत पण झाडे नको
पैसा हवाय पण कष्ट नको
संपत्ती हवीय पण म्हातारे आई वडील नको
स्वास्थ्य हवंय पण व्यायाम करणे नको
फक्त सुख हवंय पण दुःख अजिबात नको
किती स्वार्थी झालास रे माणसा,
तुला उपभोग तर हवाय
पण कशाचीही जपणूक मात्र करायला नको...
✒ K. Satish
स्त्रियांच्या जीवनातील अंधकार मिटविला
ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या मस्तकी पाडिला,
गुलामगिरीत जगणार्या असंख्य स्त्रियांना
शिक्षित करूनी नवा इतिहास घडविला
स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसेविका
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या पावन स्मृतीस त्यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन...!!!
✒ K. Satish