गतवर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घ्यावा...
त्यातील वाईट, कष्टदायी, वेदनादायी घटनांमधून पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य तो बोध घ्यावा व त्या कटू आठवणींना उराशी न बाळगता कायमची तिलांजली द्यावी.
मागील कालखंडात बर्याच चांगल्या वाईट व्यक्तींशी संबंध आला असेल, त्यातील स्वार्थी मतलबी हितशत्रूंना ओळखून आपल्या पुढील आयुष्यात स्थान देऊ नये...
परंतु, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणार्या, तुम्हाला सतत प्रोत्साहन देणार्या आणि तुमच्या वाईट प्रसंगातही तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या तुमच्या हितचिंतकांना कधीही गमावू नये...
या पृथ्वीतलावर आपल्याला जो मानवजन्म मिळाला आहे ती आपल्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. तिच्या अनुषंगाने आयुष्यात येणार्या प्रत्येक वळणावर असे काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगावी की, ' मरावे परी किर्तीरूपी उरावे ' ही म्हण आपल्याला तंतोतंत लागू होईल.
आयुष्य हे खूप सुंदर आहे... चला त्याला नव्या उमेदीने अतिसुंदर बनवण्याचा संकल्प करूया.
नवीन वर्षात आपल्या देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी हिरीरीने काहीतरी अद्वितीय करून दाखविण्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त व्हावी हीच माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून व माझ्या सर्व हितचिंतक मित्रांकडून आपणा सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा....!!!!
धन्यवाद...!!! 🙏🏻
✒ K. Satish