आजच्या या आधुनिक युगात सर्व जीवसृष्टीवर कोणते संकट कधी 'आ' वासून पुढे उभे राहील याचा काहीच भरवसा नाही.
असेच एक संकट या कोरोना व्हायरसच्या रूपाने जगावर ओढवले आहे. या संकटाने सर्वांना पुन्हा एकदा हे दाखवून दिले की, मानवाच्या जीवापुढे पैशाचा अहंकार, धर्माचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, पदाचा अहंकार हा शून्य आहे. त्यामुळे मानवाने मानवाशी मानवाप्रमाणेच वागावे व एकजुटीने संकटाला तोंड देऊन या सृष्टीला जपावे.
आणि या सर्व परिस्थितीत मानवजातीवरचे हे संकट दूर करण्यास मोलाचे योगदान देणार्या डाॅक्टर्स, नर्स, पोलिस, सैनिक, वैज्ञानिक, सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व मंडळी जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने या संकटाचा सामना करण्यासाठी लढत आहेत. त्या सर्वांना जगातील सर्व नागरिकांतर्फे मानाचा सलाम...!!!
✒ K. Satish
No comments:
Post a Comment