आपल्या अधिकारांविषयी निर्भीडपणे मते मांडण्याविषयी बर्याच लोकांशी वाद-संवाद होतात. त्यातील बहुतांशी लोकांच्या मनातील प्रस्थापित आणि धनदांडग्यांविषयीची भीती पाहून त्यांची कीव तर येतेच. परंतु, खरंच आपल्या देशातील लोकशाहीचा अर्थ खर्या अर्थाने लोकांना कळलाय का ? हा प्रश्न मनाला पडतो.
आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर बिनदिक्कतपणे हुकूमत गाजवणारे हे लोक. परंतु, जेव्हा त्यांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची जाणीव करून दिली जाते, त्यावेळी प्रस्थापित आणि धनदांडग्यांच्या प्रभावाला घाबरून ( आपण काय करू शकतो ? , हे असे होणारच , आपण हे बदलू शकत नाही , हे लोक आपल्याला संपवून टाकतील , आपलं आपण बघा , आपल्याला काय करायचीय दुनियादारी ? ) अशा ह्यांच्या प्रतिक्रिया ऐकून एक संतापाची लाट मनामध्ये येते. स्वतःचा आत्मविश्वास गमावलेल्या आत्मकेंद्रित लोकांसाठी लोकशाही निर्माण झाली आहे काय ?
ह्या प्रवृत्तीच्या सर्व लोकांना मला एवढेच विचारावेसे वाटते की , जर आपल्या सीमेवर शत्रूचा हल्ला झाला आणि सीमेवर आपले दहा हजार सैनिक लढण्यास सज्ज असतील आणि शत्रूचे सैन्यबळ मात्र पन्नास हजार आणि तेही अद्ययावत शस्त्रांनी सज्ज.....मग जर का आपल्या सैनिकांनी असा विचार केला की , आपण तर संख्येने एवढे कमी आणि शत्रू अतिशय ताकदवान.....ह्यांच्यासमोर आपला निभाव कसा लागणार ?.....त्यापेक्षा जीव वाचवून पळा.....आपल्या घरी जाऊन आपलं आयुष्य निवांत जगा.....कशाला ही दुनियादारी ?
तर मग तुमचं-आमचं काय होईल ?
जरा विचार करा , हे सैनिक जर त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता फक्त आपल्या देशाच्या आणि देशबांधवांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करण्यास हसतमुखाने तयार असतील तर आपण आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी लढताना भीती का बाळगावी ?
विचार करा आणि आपल्या हक्क आणि अधिकारांची पायमल्ली होत असेल तर समोर कितीही मोठी ताकद असली तरी एकजुटीने निधड्या छातीने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यास सज्ज रहा.....!!!
धन्यवाद........!!!
✒ K. Satish
Great
ReplyDelete