सध्या आपल्या मिडियाने पत्रकारिता या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अगदी खिल्ली उडवून त्याला नेस्तनाबूत करण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.
हे चॅनल्स बी ग्रेड चित्रपटांसारखे, अश्लील विनोदांसारखे, आणि क्रीम लावून गोर्या बनवणाऱ्या बनावट जाहिरातींसारखे भासतात.
हे चॅनल पाहणे म्हणजे आरोग्यास धोका निर्माण करणे होय. आणि यांना तुम्ही मनोरंजन म्हणून जरी पाहायला गेलात तरीही त्यामुळे तुमचा अनमोल वेळ वाया जाऊन तुमच्या हृदयावरील ताण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे सध्या यांच्यापासून जेवढे दूर रहाल तेवढे उत्तम...!!!
✒ K. Satish
No comments:
Post a Comment